चार्ल्स कोरिया
    

चार्ल्स कोरिया हे आर्किटेक्ट, नियोजनकार, सक्रिय कार्यकर्ता, सैध्दान्तिक, आणि समकालीन वास्तुकलेतील जागतिक पातळीवरच्या चित्राताल एक मूलभूत महत्तवाची व्यक्ती आहेत. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन आणि मॅसॅच्युसेट्स् इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे वास्तुशास्त्राचा अभ्यास केला आणि त्यानंतर १९५८ मध्ये मुंबईत खाजगी व्यवसाय प्रस्थापित केला. भारतात त्यांनी केलेले कार्य अ-पाश्चिमात्य संस्कृतीत आधुनिक विचारसरणीचा काळजीपूर्वक विकास, आकलन आणि योग्य जुळणी कशी करता येते हे दाखवणारे आहे. त्यांची सुरूवातीची कामे आधुनिक पर्यावरणात स्थानिक देशीपणाचा कसा वापर करता येईल याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणारी आहेत. त्यांनी केलेले जमीन – वापराचे नियोजन आणि सामाजिक प्रकल्प हे सतत तिसर्‍या जगाच्या समस्यांवरील ठरावीक उपायांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करीत असतात.

गेल्या चार दशकांत कोरिया ह्यांनी तिसर्‍या जगातील नागरी प्रश्नांवर आणि अल्पखर्चाच्या निवार्‍यावर पथदर्शी काम केलेले आहे. १९७०-७५ च्या दरम्यान ते नवी मुंबई ह्या, अस्तित्वात असलेल्या शहराच्या बंदराच्या समोर उभारलेल्या, २ दशलक्ष लोकांची वस्ती असलेल्या नागरी विकास केंद्राचे प्रमुख आर्किटेक्ट होते. १९८५ मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांची नॅशनल कमिशन ऑन अर्बनायझेशनचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली.
१९८४ चे आरआयबीए रॉयल गोल्ड मेडल देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. एमआयटी येथे मॅकगव्हर्न इन्स्टिटयूट फॉर ब्रेन रिसर्चसाठी त्यांनी केलेले डिझाईन नावाजले गेले आणि ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. भारतातील लोकपुरस्कार पद्मविभूषण (२००६) आणि पद्मश्री यांचेही ते धनी आहेत.

 

   

 

भाऊ कोर्डे
    

रामचंद्र वाय. कोर्डे (भाऊ) हे त्यांच्या आयुष्यभर ह्या वस्तीशी अत्यंत जवळच्या नात्याने निगडित असलेले असे धारावीचे एक रहिवासी आहेत. त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुमारे 40 वर्षे शीव (सायन) च्या डी.एस.हायस्कूलमध्ये व्यवस्थापनात काम केले आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात धारावीने पाहिलेल्या बहुसंख्य राजकीय उलथापालथींत ते सहभागी झालेले आहेत. ह्या वस्तीत जातीय दंगली होऊ नयेत म्हणून स्थानिक समित्या स्थापणे आणि प्रसारमाध्यमांचा नवनवीन पध्दतींनी उपयोग करून पावले टाकण्यात पुढाकार घेणे यासाठी त्यांनी समरसून काम केले आहे. ते संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या भटक्या जमातींच्या (भटक्या विमुक्त जाती) चळवळीशीही निगडित आहेत.

     

 

शिरीष पटेल
   

 

श्री. पटेल हे सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्यांना निरनिराळ्या गोष्टींत रस आहे ज्यांमध्ये सार्वजनिक बांधकामे, विशेषतः धरणे, पूल आणि सागरी बांधकामांची रचना यांची स्थापत्यशास्त्रीय संकल्पना तयार करणे; नगर नियोजन आणि नागरी प्रश्न; कारखाने आणि इतर संकुलांचे, इतर विद्याशाखांचे सहकार्य घेण्याचा दृष्टिकोन ठेवून नियोजन; सौर शक्तीचे संशोधन; आणि सॉफ्टवेअरचा विकास असा चौफेर समावेश होतो.

१९६० मध्ये त्यांनी फर्म (कंपनी) ची स्थापना केली. ती व्यावसायिकांच्या मालकीची आहे आणि व्यावसायिकांकडून चालवली जाते. कार्यालयातील प्रत्येक इंजिनियरला असोशिएट (भागीदार) होण्याची संधी मिळण्याचा मार्ग उपलब्ध असतो. आता जवळजवळ ७० संख्या असलेल्या त्यांच्या संपूर्ण कर्मचारीवर्गातील कमीतकमी पगार असलेल्या कर्मचार्‍यापासून ते असोशिएटपर्यंत सर्वजण नफा समान प्रमाणात वाटून घेतात.

 

   

 

कल्पना शर्मा
    

कल्पना शर्मा ह्या एक मुंबईस्थित स्वतंत्र पत्रकार, सदर लेखक आणि माध्यम सल्लागार आहेत. जून २००७ पर्यंत त्या मुंबईमध्ये ‘हिंदू’ च्या डेप्युटी एडिटर (सहसंपादक) आणि चीफ ऑफ ब्यूरो (ब्यूरोच्या प्रमुख) म्हणून काम करीत होत्या. पूर्ण वेळ पत्रकार म्हणून ३० वर्षांहून जास्त काळात त्यांनी हिम्मत वीकली, इंडियन एक्सप्रेस आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ पदे सांभाळलेली आहेत. पर्यावरण विषयक आणि विकासविषयक प्रश्न हे त्यांना खास रस असलेले प्रांत आहेत. ‘द हिंदू’ च्या रविवार पुरवणीतील, लिंगसापेक्ष दृष्टिकोनातून समकालीन प्रश्नांवर टीकाटिप्पणी करणार्‍या ‘द अदर हाफ’ नावाच्या विभागातून त्या पाक्षिक सदर लेखन करतात. त्यांनी विशेषतः मुंबईच्या विकासाच्या संदर्भातील नागरी प्रश्नांचा मागोवाही घेतलेला आहे आणि त्यावर टिप्पणीही केलेली आहे.

कल्पना शर्मा ह्या “रीडिस्कव्हरिंग धारावी: स्टोरीज् फ्रॉम एशियाज् लार्जेस्ट स्लम” (पेंग्विन २०००) ह्या पुस्तकाच्या लेखिका आहेत आणि अम्मू जोसेफ यांच्याबरोबर “हूज् न्यूज? द मीडिया ऍण्ड विमेन्स इश्यूज” (सेज १९९४, २००६) आणि “टेरर काउंटरटेरर: वीमेन स्पीक आऊट” (काली फॉर विमेन, २००३) या पुस्तकांचे सहसंपादन केले आहे.