संयोजक

अर्बन टायफून वर्कशॉप कोळीवाडा हा एक सहकारातून आकाराला आलेला प्रकल्प आहे. याचे संयोजन कोळीवाडयाचे रहिवासी, स्वतंत्रपणे काम करणारे संशोधक आणि चळवळीतले कार्यकर्ते, आणि पुकार (पार्टनर्स फॉर अर्बन नॉलेज, ऍक्शन ऍण्ड रिसर्च) ही मानववंशशास्त्र (ऍन्थ्रॉपॉलॉजिस्ट) अर्जुन अप्पादुराई यांनी स्थापन केलेली मुंबईस्थित सामुदायिक संशोधनाची संस्था यांनी मिळून केले आहे.

संयोजन करणार्‍या गटात पुढील लोक आहेत :-

  रवी केणी / कोळीवाडा, धारावी, मुंबई येथील समाजाचे नेतेai
   
रवींद्र केणी हे कोळीवाडयातील धारावी-कोळी जमात ट्रस्टचे सेक्रेटरी आहेत आणि ह्या कार्यशाळेला चालना देणार्‍या प्रमुख आयोजकांपैकी एक आहेत. ते सध्या गोव्यातील सेंट्रल एक्साईज एण्ड कस्टम्समध्ये सुपरिंटेंडंटही आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून एम्.ए. पदवी प्राप्त केली आहे आणि ओहायो, यू.एस.ए. मधील यूएस कराटे फेडरेशनकडून सिक्स्थ डिग्री ब्लॅक बेल्टही मिळविला आहे. कोळी समाजाच्या आदिम इतिहासात ते उत्कटतेने रस घेतात आणि त्यांनी ह्या गोष्टीची खंत वाटते की धारावीच्या कोळीवाडयाची जी सद्यःस्थिती आहे तिच्यावर महानगरपालिकेच्या प्रशासनाने कोळीवाडयाची खेडेसदृश रचना लक्षात घेण्याच्या असमर्थतेचा घोर परिणाम झाला आहे.
   

 

  भाऊ कोर्डे / समाजसेवक, धारावी, मुंबई
 

रामचंद्र वाय. कोर्डे (भाऊ) हे धारावीचे असे रहिवासी आहेत जे या लोकवस्तीशी त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर अतिशय जिह्वाळ्याने निगडित आहेत. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुमारे चार दशके त्यांनी डी.एस. हायस्कूल, सायन येथे व्यवस्थापनात काम केले आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात धारावीने पाहिलेल्या बहुतेक राजकीय उलथापालथीचा ते एक भाग होते. ह्या वस्तीत जातीय दंगली होऊ नयेत म्हणून स्थानिक समित्या स्थापणे आणि प्रसारमाध्यमांचा नवनवीन पध्दतींनी उपयोग करून पावले टाकण्यात पुढाकार घेणे यामध्ये त्यांनी समरसून काम केले आहे. ते संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या भटक्या जमातींच्या (भटक्या विमुक्त जाती) चळवळीशीही निगडित आहेत.

   

  अनिता पाटील देशमुख / कार्यकारी संचालक पुकार, मुंबई
 

डॉ. अनिता पाटील देशमुख ह्या पुकारच्या कार्यकारी संचालक आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून एम.बी.बी.एस., युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉयमधून एम्.डी. आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून मास्टर इन पब्लिक हेल्थ ह्या पदव्या प्राप्त केल्या आहेत. शिकागोमधील एका शिक्षणसंस्थेत फॅकल्टी फिझिशियन म्हणून वीस वर्षे अध्यापन करीत असतानाच अनिता ह्या पीडियाट्रिक रेसिडेन्सी प्रोग्रॅमच्याही संचालक होत्या. अमेरिकेतील त्यांच्या वास्तव्यात इंडिया डेव्हलपमेंट सर्व्हिस (आय डी एस) या अमेरिकेतील संपूर्ण भारतभर चालणार्‍या अनेक तर्‍हेतर्‍हेच्या, अल्पपरिमाण (स्मॉल स्केल), सामाजिक – आर्थिक विकासाच्या प्रकल्पांना मदत करणार्‍या आद्य संस्थेतही त्यांनी अतिशय महत्त्वाची नेतृत्वाची भूमिका बजावली. त्यांनी शिकागोमध्ये विकासविषयक समस्यांवर अनेक महत्त्वाचे परिसंवाद आयोजित केले आणि भारतातील तसेच अमेरिकेमधील अनेक परोपकारी संस्था आणि नेते यांच्यांत दुवा जुळवण्यास मदत केली. त्या इंडिया चायना इन्स्टिटयूट (द न्यू स्कूल, न्यू यॉर्क) यांच्याही वरिष्ठ सल्लागार आहेत.

   

 

  गीता मेहता / असोशिएट प्रोफेसर, टेंपल युनिव्हर्सिटी, टोकयो
 

गीता मेहता या टेंपल युनिव्हर्सिटी जपान कॅम्पसमध्ये आर्किटेक्चर आणि अर्बन स्टडीज (वास्तुशास्त्र आणि नागरी अभ्यास) या विषयांच्या असोशिएट प्रोफेसर (सहकारी प्राध्यापक) आणि दिल्ली स्कूल ऑफ प्लॅनिंग ऍण्ड आर्किटेक्चरमध्ये अतिथी प्राध्यापक आहेत. त्या एशिया इनिशिएटिव्ह नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षही आहेत आणि जपानमधील अमेरिकन इन्स्टिटयूट ऑफ आर्किटेक्चरच्या निर्वाचित अध्यक्षही आहेत. गीता यांनी जपान, यूएस, भारत, व्हिएतनाम आणि इंडोनेशियामध्ये वास्तुशास्त्रीय आणि नागरी संरचनाविषयक प्रकल्पांवर काम केले आहे. त्यांनी वास्तुशास्त्रावर अनेक पुस्तके लिहिली आहेत आणि सध्या त्या आशियाई शहरांतील आर्थिक प्रगती आणि सामाजिक न्याय यांमध्ये नागरी संरचनेची कोणती भूमिका असते यावर संशोधन करीत आहेत. त्या नवी दिल्ली येथील स्कूल ऑफ प्लॅनिंग ऍण्ड आर्किटेक्चर तसेच न्यूयॉर्कमधील कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या स्नातक आहेत आणि त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ टोकयोमधून पीएच.डी. प्राप्त केली आहे.

   

  राहुल श्रीवास्तव / संशोधन सल्लागार, पुकार, मुंबई
 

राहुल श्रीवास्तव पुकार आणि एरूटस् यांच्याबरोबर नागरी प्रश्नांवर काम करतात. ते तरुण वाचकांसाठी ललित लेखनही करतात आणि त्यांचा मुक्काम गोव्यात असतो. त्यांना जितक्या जास्तीत जास्त वादळांच्या केंद्रबिंदूंत राहायला मिळेल तितके हवेच असते आणि जगाच्या पाठीवरील शहरांना मधूनमधून ठराविक काळाने झोडपणार्‍या नागरी तुफानांमध्ये खेचले जाणे ही त्यांच्यासाठी थरारक संधी असते. त्यांनी मुंबई, दिल्ली आणि केंब्रिज (यूके) येथे मानववंशशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. लोकप्रिय संस्कृती यांवर लेखन केले आहे.

   


  मतियास सेंदोआ एखानोव्ह / संशोधक, युनिव्हर्सिटी ऑफ टोकयो
 

मतियास एस. एखानोव्ह अर्बन टायफून वर्कशॉप इन कोळीवाडाचे समन्वयक आहेत आणि पूर्वी त्यांनी टोकयोमध्ये अर्बन टायफून वर्कशॉप इन शिमोकिताझावाचे समन्वयन केलेले आहे. त्यांच्या संशोधनविषयक आवडीच्या गोष्टींमध्ये विकास, वास्तुशास्त्र आणि संरचना यांसाठी माहिती तंत्रज्ञान, अनौपचारिक अर्थकारण आणि अनौपचारिक वसाहती, पथसंस्कृती (स्ट्रीट कल्चर) आणि संगीत यांचा समावेश होतो. ते सध्या युनिव्हर्सिटी ऑफ टोकयोमध्ये न्यू यॉर्क, टोकयो, बोगोटा आणि मुंबईमधील नमुना-प्रश्नांच्या अभ्यासावर आधारित नागरी माहिती व्यवस्था आणि सहभागी संयोजन या प्रकल्पावर आधारित पीएच.डी. पूर्ण करीत आहेत. टोकयोत स्थलांतर करण्यापूर्वी ते न्यू यॉर्क आणि लंडनमध्ये राहत होते जिथे त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ऍण्ड पोलिटिकल सायन्सेसमध्ये अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांचा आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये नागरी नियोजनाचा अभ्यास केला.

   

 

  कातिया सावचुक / हार्वर्ड पोस्ट ग्रॅज्युएट फेलो आणि स्पार्क, मुंबई येथे इंटर्न
 

कातिया सावचुक ह्या सध्या सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ एरिया रिसोर्स सेंटर्स (स्पार्क) ह्या एका मुंबईस्थित स्वयंसेवी संस्थेतील फेलो म्हणून धारावीच्या पुनर्विकासाशी संबंधित अशा प्रकल्पांवर काम करीत आहेत. त्यांनी जून २००७ मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून समाजशास्त्रात ए.बी. मिळवून पदवी प्राप्त केली. २००८ मध्ये त्या कायदा आणि नागरी नियोजन यांचा अभ्यास करण्यासाठी युनायटेड स्टेट्सला परत जातील.

   


  अनुपमा जोशी / ऑफिस मॅनेजर, पुकार, मुंबई
 

अनुपमा जोशी ह्या ऑफिस मॅनेजर म्हणून पुकारमध्ये जुलै २००५ पासून काम करीत आहेत. त्यापूर्वी त्या सोफिया पॉलिटेक्निकमध्ये शिकवत होत्या आणि अवेहि ऑडियोव्हिज्युअल एज्युकेशन रिसर्च सेंटर मध्ये प्रशिक्षणकार्यक्रमांचे आयोजन करीत होत्या. नुकताच त्यांनी इकॉलॉजी, नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट (पर्यावरण आणि प्राकृतिक साधनसंपत्ति व्यवस्थापन) या विषयातील डिप्लोमा केला आहे.

   

 

  तोमो ताकेदा / आर्किटेक्ट, बार्सिलोना
 

तोमो ह्यांनी तोकयो देन्की विद्यापीठात आर्किटेक्ट आणि मास्टर ऑफ आर्किटेक्चरल प्लॅनिंग म्हणून प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी युनिव्हर्सिटाट पॉलिटेक्निका द काटालुन्या येथे ला ग्रान एस्काला हा मास्टर प्रोगॅमही पूर्ण केला. त्यांनी इंटीरिअर डिझाईन, लॅण्डस्केप डिझाईन आणि वेब डिझाईन अशा वास्तुशास्त्रीय मध्यस्थीचा वापर करता येऊ शकेल अशा अनेक प्रक्रियांचा शोधही घेतलेला आहे. त्यांनी केवळ प्रकल्पांच्या संकल्पनेवरच नाही तर प्रकल्पांच्या व्यवस्थापनवरही आपले लक्ष केंद्रित केले. सध्या त्या वास्तुशास्त्रीय संकल्पनांचे कार्य करतात तसेच एल् तोस्तादेरो हा रेकॉर्डिंग स्टुडियोही चालवतात, आणि वेबडिझायनर म्हणूनही काम करतात. त्या अर्बन टायफून वर्कशॉपच्या वेबमास्टर आहेत.