कार्यशाळा संयोजन

कार्यशाळेचे प्रमुख आपल्या गटांसाठी बीजविषय निवडतील आणि सहभागींना सर्जनशीलतेचे पूर्ण स्वातंत्र्य अबाधित राखून कार्यप्रक्रियेत पुढे कसे जावे याचे मार्गदर्शन करतील. प्रत्येक गटात ठराविक संख्येत (५ ते १० च्या दरम्यान) सहभागी असतील. प्रत्येक गट हा एक संघ म्हणून काम करू शकतो किंवा छोटयाछोटया संघांत विभागला जाऊ शकतो. अंतिमतः सर्व सहभागी समान उद्दिष्टांचाच पाठपुरावा करणार आहेत आणि निरनिराळ्या गटांना एकमेकांशी सहकार्य करण्याचे स्वातंत्र्य आहे. जोपर्यंत गटाचा संयोजक मुद्दाम मागून घेत नाही तोपर्यंत सहभागींनी त्यांच्या अभ्यासाच्या विषयाशी संबंधित असलेला गटच निवडला पाहिजे असे नाही.

(कार्यशाळेचे) गट हे भिन्न–सांस्कृतिक आणि भिन्न पिढयांचे बनलेले असतील. प्रत्येक गटात किमान एक स्थानिक आणि एक आंतरराष्ट्रीय सहभागी असेल. केलेल्या कामाचे फलित मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांत असेल.

नावनोंदणी केल्यानंतर सहभागींनी त्याला अथवा तिला कोणत्या गटात रूजू होणे आवडेल, ते पसंतीच्या क्रमातून दर्शवावे अशी अपेक्षा आहे. सर्व सहभागींनी एक लॅपटॉप आणायला हवा. जर त्यांच्याकडे नसेल तर तसे त्यांनी अर्जाच्या फॉर्ममध्ये नमूद करायला हवे. भारतीय विद्यार्थ्यांना विनंती आहे की जर शक्य असेल तर त्यांनी परदेशी सहभागींना आपल्या घरी निवास द्यावा.