DCOOP / मुंबई
कैद डूंगरवाला, शिल्पा रानडे, संजय चिकरमाने
   
 

कैद डूंगरवाला आणि शिल्पा रानडे यांनी 2003 मध्ये स्थापन केलेला DCOOP हा अनेक पुरस्कार मिळवलेला डिझाईन स्टुडिओ आहे जो समकालीन भारतातील समर्पक संकल्पना, प्रक्रिया, कृती यांचा नव्याने विचार करण्याकडे वाटचाल करत आहे. ह्या स्टुडियोला श्रेय मिळालेल्या बाबींमध्ये निरनिराळ्या स्तरांवर निर्मिलेल्या आणि निर्मिती चालू असलेल्या अनेक प्रकल्पांचा - वस्तू, अंतर्भाग, वास्तुकला, लॅण्डस्केप आणि नागरी संकल्पना - यांचा समावेश होतो.

‘पॉलिटिक्स ऑफ अर्बन फॉर्म’ या विषयावर प्रबंध लिहून कैद अहमदाबादच्या सीईपीटी मधून पदवी मिळवून बाहेर पडले आणि नंतर त्यांनी कोलंबोमध्ये जॉफ्री बावा तसेच मुंबईमध्ये राहुल मेहरोत्रा या आर्किटेक्ट्स बरोबर काम केले. नंतर त्यांनी स्वतंत्र काम सुरू केले तसेच ऍण्ड्रिया ऍनास्तासिओ या डिझायनर बरोबर अनेक प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला. कैदला खास करून शहराच्या नजरेस पडणार्‍या संस्कृतीत, त्यातल्या त्यात रस्त्यावरच्या बाजारांवर लक्ष केंद्रित करण्यात जास्त रस आहे.

शिल्पाचे प्रशिक्षण वास्तुशास्त्र (सीईपीटी, अहमदाबाद) आणि (सांस्कृतिक अभ्यास) कल्चरल स्टडीज् (एम.ए. युनिस्हर्सिटी ऑफ ऍरिझोना, टस्कन) यांत झाले आहे. DCOOP मधील कामाव्यतिरिक्त त्या पुकारमध्ये जेंडर ऍण्ड स्पेस प्रकल्पात सहसंशोधक (रिसर्च असोशिएट) म्हणून काम करतात आणि ह्या प्रकल्पावर आधारित एका पुस्तकाचे शिल्पा फडके आणि समीरा खान यांच्या बरोबर सहलेखक म्हणून लेखन करीत आहेत.

संजय चिकरमाने यांनी मुंबईतील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे आणि तेथेच ते सध्या स्ट्रक्चरल इंजिनियरिंगमध्ये पीएच्. डी. चा अभ्यास करीत आहेत. संजय यांनी कमी खर्चाच्या निवार्‍याचे प्रकल्प तसेच भुज (गुजरात) येथे भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन यांमध्ये संकल्पना, विकास यांचे आणि पथदर्शी काम केलेले आहे, तसेच अनेक वास्तुशास्त्रीय प्रकल्पांवर काम केले आहे. त्यांनी राजकोट येथील आयपीएसए कॉलेजमध्ये वास्तुशास्त्राचे अध्यापनही केलेले आहे.

     

स्मिता दळवी आणि मुस्तनिर दळवीi / मुंबई
   
 

स्मिता दळवी या पिल्लेज कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (नवी मुंबई) येथे असिस्टंट प्रोफेसर आहेत. आर्किटेक्चर आणि कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट (IIT – Delhi) या विषयांत पदवी मिळवून नंतर त्यांनि भारतीय सौंदर्यशास्त्र या विषयाचा पदव्युत्तर डिप्लोमा केला आहे. २००७ साली फुलब्राईट व्हिजिटिंग स्पेशलिस्ट म्हणून त्या अमेरिकेला गेल्या होत्या आणि तेथील अनेक विद्यापीठांत ‘इस्लामिक आर्ट ऍण्ड आर्किटेक्चर’ हा विषय शिकवला. ‘MES Research Forum’ च्या त्या संस्थापक सदस्य आहेत. ‘न्यू आर्किटेक्चर ऍण्ड अर्बनिझम : डेव्हलपमेंट ऑफ ट्रॅडिशन्स’ (Deependra Prashad, Ed. INTBAU 2008) या पुस्तकात त्यांचे संशोधन प्रकाशित झाले आहे. त्यांनी इतर काही प्रकाशनांसाठीसुध्दा लेख लिहिले आहेत – उदा. इंडियन आर्किटेक्चर ऍण्ड बिल्डर; आर्किटेक्चर : टाईम, स्पेस ऍण्ड पीपल आणि जर्नल ऑफ द इंडियन इंस्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स. स्मिता दळवी यांनी स्थापत्यशास्त्रीय इतिहास आणि शहरी वारसा यांवर भारत, अमेरिका आणि इटली येथे सादरीकरणे केली आहेत.

मुस्तनसिर दळवी हे सर जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे शिकवतात. आर्किटेक्चर आणि भारतीय सौंदर्यशास्त्र या विषयांत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. स्थापत्यशास्त्राचे शिक्षण आणि समकालीन भारतीय स्थापत्यशास्त्रीय इतिहास यांवर त्यांनी व्याख्याने दिली आहेत आणि लेखन केले आहे. स्थापत्यशास्त्राच्या काही प्रमुख पुस्तकांत त्यांचे लेख आहेत – उदा. ‘बिल्डिंग्ज दॅट शेप्ड बॉम्बे : द आर्किटेक्चर ऑफ जी. बी. म्हात्रे’; ‘क्वाएट कॉन्व्हर्सेशन्स : द आर्किटेक्चर ऑफ कामू अय्यर’ आणि मुल्क राज आनंद यांच्यावरील एक ग्रंथ. इतरही काही प्रकाशनांसाठी त्यांनी लेखन केले आहे – उदा. डोमस, द जर्नल ऑफ इटालियन डिझाईन, मार्ग, आर्ट इंडिया, आर्किटेक्चर+डिझाईन, इंडियन आर्किटेक्चर ऍण्ड बिल्डर, आर्किटेक्चर : टाईम, स्पेस ऍण्ड पीपल आणि द जर्नल ऑफ द इंडियन इंस्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स. मुंबई शहराचे मेट्रोपोलिस मध्ये रूपांतर होताना महानगराच्या स्थापत्यशास्त्राचा कसा विकास होत आहे या विषयात त्यांना रस आहे.


     

पॉल डेव्हरो / मॅड डीसेंट, यूएसए
   

 

पॉल डेव्हरो हे व्हँकुव्हर, कॅनडामध्ये राहणारे प्रमोटर आहेत आणि त्यांना जगाच्या पाठीवरील सर्व भागांतून ऐकू येणार्‍या नवीनातल्या नवीन आणि ताज्यांतल्या ताज्या आवाजांविषयी उत्कट प्रेम वाटते. गेल्या वर्षी मॅड डीसेंट ब्लॉगचा चेहरा आणि अधिकृत मॅड डीसेंट प्रमोटर म्हणून टेस्टमेकर डिप्लो यांच्याकडून निवड झाल्यापासून पॉल यांनी जगभर प्रवास केलेला आहे. त्यांची सर्वांत ताजी सीडी “तोमो ३” हिचे विमोचन करण्यासाठी पॉलने त्या समारंभाचा दुहेरी उपयोग करून घेतला कारण त्यांना ब्राझीलमधील रिओ दि जानेरोच्या रोचिन्हा येथील गरीबांच्या वस्तीत शैक्षणिक संधी पुरविण्यासाठी टू ब्रदर्स फाउंडेशनला मदत व्हावी म्हणून निधी उभारायचा होता.

   

हिमांशु / मुंबई
    

हिमांशुने सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधील शिक्षण अर्धवट सोडले (कारण त्याचे सादरीकरण स्वीकारले गेले नव्हते – प्राध्यापकांना त्याची कामे पुरेशी अभ्यासविषयाला धरून वाटली नव्हती). मात्र, अगदी आश्चर्यकारकरीत्या त्याने ती संस्था सोडण्यापूर्वी ‘फेलो’ म्हणून एक वर्षभर त्याच संस्थेत शिकवण्याचे कामही केले. तेव्हापासून तो मुंबईच्या रस्त्यांवरून भटकत आहे, कल्पनांचा संचय करत आहे आणि त्यांचे आदानप्रदान करीत आहे, छोट्या योजनांमधून अनेक लोकांच्या सहकार्याने त्या प्रत्यक्षात आणत आहे. सार्वजनिक जागांमध्ये काम करण्याबरोबरच कधीकधी तो गॅलरीसारख्या ठिकाणी आपल्या कलेचे प्रदर्शनही करतो. कसेतरी करून तो जिवंत राहण्याची धडपड चालू ठेवतो.

     

कामू अय्यर / मुंबई
    

 

     

सुभाष मुकर्जी / टोरिनो
    

जन्म १९७४, मसूरी
सुभाष मुकर्जी हे आर्किटेक्ट असून त्यांनी टोरिनो, ऑस्लो, बॉस्टन, हाँगकाँग इ. ठिकाणीशिक्षण घेतले आहे, आणि फ्रांस, स्पेन, ग्रीस, रशिया येथे त्यांनी डिझाईन वर्कशॉपमध्ये भाग घेतला आहे. त्यांचा कल दाटीवाटीच्या आणि नाजुक परिस्थितीच्या परिसराचा अभ्यास करण्याकडे आहे आणि यावरचे त्यांचे लेख आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत छापून आले आहेत (अबिटेअर, द आर्किटेक्ट, डोमस, ड्वेल); त्यांचे यावरचे काम प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे ( व्हेनिझिया २००४ आणि नापोली २००७) आणि व्याख्यानांतून सादर झाले आहे (कोंकुक युनिव्हर्सिटी, सेऊल आणि CCA, मॉस्को). टोरिनो येथे ‘आर्किटेक्चरल डिझाईन’ या विषयाचा कोर्स ते आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी २००१ पासून शिकवत आहेत. पोलिटेक्निको दे टोरिनो येथेही ते कोम करतात. इटलीमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित होणार्‍या विविध नियतकालिकांत त्यांचे स्थापत्यशास्त्रावरील लेख प्रसिध्द झाले आहेत. व्हेनिझिया येथे २००६ साली झालेल्या आंतरराष्ट्रीय स्थापत्यशास्त्रीय प्रदर्शनात मुकर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार्‍या विद्यार्थ्यांच्या गटाने स्पेशल ज्यूरी प्राईझ पटकावले होते. मुंबईतील बॅक बे विभाग हा त्यांच्या प्रॉजेक्टचा विषय होता.
२००६ साली त्यांनी मायकेल बोनिनो यांच्याबरोबर MARC हे डिझाईन ऑफिस सुरू केले. MARC चे विविध प्रॉजेक्ट्स गेल्या काही वर्षांत विविध नियतकालिकांत छापून आले आहेत आणि काही युनिव्हर्सिटीजमध्ये सादरही झाले आहेत.

   

हुदिता मुस्तफा / बॉस्टन
    

हुदिता नुरा मुस्तफा यांनी येल आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून राजकीय अर्थव्यवस्था आणि मानववंशशास्त्र या विषयांत पदव्या मिळवल्या आहेत. शहरांमध्ये असणार्‍या असंघटित अर्थव्यवस्था, सांस्कृतिक निर्मिती, वैश्विक प्रक्रियांच्या संदर्भात दिसून येणार्‍या सर्वसामान्यांच्या सर्जनशीलता हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. पश्चिम आफ्रिका, युरोप आणि आशियामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी स्थानिक लोकजीवनाचा अभ्यास केला आहे. ‘आफ्रिकेतील वैश्विक शहरे’, ‘सेनेगल येथील असंघटित अर्थव्यवस्था’ तसेच ‘दृश्य संस्कृती’ अशा विविध विषयांवर त्यांनी लेखन केले आहे व व्याख्याने दिली आहेत.
‘प्रॅक्टिसिंग ब्यूटी’ या प्रॉजेक्टमध्ये त्यांनी डकार येथील कठीण राजकीय परिस्थिती आणि सर्जनशीलता यांमधील विरोधाभासातून तयार होणारी अर्थव्यवस्था आणि फॅशन यांचा अभ्यास केला आहे. हुदिता यांनी एमरी ऍण्ड सारा लॉरेंस कॉलेज येथे अध्यापन केले आहे आणि सध्या त्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मॅक्मिलन-स्टुअर्ट फेलो आहेत.

     

विद्याधर फाटक / मुंबई
    

विद्याधर फाटक हे मुंबईतील नागरी नियोजन आणि विकास या विषयांवर काम करणार्‍या शासकीय प्रभागांतून ३७ वर्षे अनुभव घेऊन, MMRDA च्या सेवेतून प्रिंसिपल चीफ, टाऊन एण्ड कंट्री प्लॅनिंग डिव्हिजन म्हणून २९ फेब्रुवारी २००४ रोजी निवृत्त झाले. शहरी आणि निवाराविषयक प्रभागांचा अभ्यास, सिटी डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी, डेव्हलपमेंट बॅंक्ससाठी प्रकल्प तयार करणे, त्यांचे मूल्यमापन करणे आणि स्थानिक प्रशासनाला आर्थिक मदत मिळवून देणे तसेच खाजगी-व-सार्वजनिक-सहकारातून उभ्या राहणार्‍या प्रकल्पांचे नियोजन व बांधणी करणे इ. गोष्टींमध्ये त्यांना रस आहे.
एम् यू टी पी मधील अनेक उपप्रकल्पकेंद्रित अभ्यास, PM10 रि़डक्शन स्ट्रॅटेजी फॉर मुंबई आणि संगणकावर आधारित प्रकल्पस्पष्टीकरण-प्रणालींचा विकास यांच्याशी ते निगडित होते. ह्या कालखंडातील शेवटची दोन वर्षे त्यांनी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एम आर व्ही सी) च्या संचालक मंडळावर (इन्फ्रास्ट्रक्चर ऍण्ड कमर्शियल डेव्हलपमेंट) चे संचालक म्हणून ही काम केले आहे. त्या पदावरून काम करताना त्यांनी मुंबईतील उपनगरी रेल्वे स्टेशनांवरील अवकाशाच्या हक्कांचा विकास करण्यासाठी अभ्यास करण्याचे प्रयत्नही सुरू केले.

     

येहूदा साफ्रान / पॅरिस
   

 

येहूदा एमॅन्युएल साफ्रान यांनी लंडनमधील सेंट मार्टिन्स स्कूल ऑफ आर्ट, द रॉयल कॉलेज ऑफ आर्ट आणि युनिव्हर्सिटी कॉलेज येथे शिक्षण घेतले. त्यांनी आर्किटेक्चरल असोसिएशन, गोल्डस्मिथ्स कॉलेज, चेल्सी स्कूल ऑफ आर्ट आणि द रॉयल कॉलेज ऑफ आर्ट, लंडन येथे अध्यापन केले; तसेच यानवान आश्क अकॅडमी, मास्ट्रिख्ट, हॉलंड येथे फाइन आर्ट आणि थियरी याचे अध्यापन केले. त्यांनी कला, वास्तुशास्त्र आणि चित्रपट यांचे सिध्दान्त आणि प्रत्यक्ष कृती यांच्या अनेक पैलूंवर निबंध लिहून डोमस, साइट ऍण्ड साउण्ड, लोटस, ए+यू, ए ए फाईल, स्प्रिंगर इत्यादी नियतकालिकांतून प्रकाशित केले आहेत. त्यांनी मिएस फान डर रोह यांच्यावर लिहिलेले पुस्तक गेल्या वर्षी लिस्बनमध्ये ब्लाऊ यांनी तर बार्सिलोनामध्ये गुस्टाव्हो जिली यांनी प्रकाशित केले. त्याबरोबरच त्यांनी ब्रिटिश आर्ट कौन्सिलचे प्रवासी प्रदर्शन ‘द फ्रेडरिक किएस्लर शो’ यांचे आर्किटेक्चर असोसिएशनमध्ये आयोजन केले. ते 9H (नाइन एच) गॅलरीचे एक विश्वस्त होते आणि लंडनमधील आर्किटेक्चर फाउंडेशनचे संस्थापकसदस्य होते तसेच पॅरिसमधील कॉलेज इंटरनॅशनल दी फिलोसोफीचे सभासद होते. सध्या ते पॅरिसमध्ये राहत आहेत आणि काम करीत आहेत आणि न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया युनिव्हर्सिटीतील ग्रॅज्युएट स्कूल ऑफ आर्किटेक्चर, प्लॅनिंग ऍण्ड प्रिझर्वेशनमध्ये वास्तुशास्त्र आणि सिध्दान्त यांचे अध्यापन करतात. येथे ते एएआरआयईएल, आर्ट ऍण्ड आर्किटेक्चर रिसर्च लॅबचे संचालनही करतात. ते स्वित्झर्लंडमधील मेंडिरिसो ऍकॅडमी ऑफ आर्किटेक्चर तसेच चीनमधील नानजिंग इन्स्टिटयूट ऑफ आर्किटेक्चर येथे अतिथी प्राध्यापक म्हणूनही अध्यापन करतात.

   

अभय सरदेसाई, आर्ट इंडिया / मुंबई
    

अभय सरदेसाई हे आर्ट इंडिया ह्या समकालीन कलेवर लक्ष केंद्रित करणार्‍या सर्वांत प्रमुख भारतीय कला नियतकालिकाचे संपादक आहेत. ते मुंबई विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात तसेच कमला रहेजा विद्यानिधी इन्स्टिटयूट ऑफ आर्किटेक्चर मधील कलाविषयक अध्यासनात सौंदर्यशास्त्र विषयाचे अतिथी प्राध्यापकही आहेत. निरनिराळ्या जर्नल्समध्ये कला आणि साहित्य यांच्यावर लिहिण्याव्यतिरिक्त त्यांनी ललितसाहित्य आणि काव्यही लिहिलेले आहे. अभय सरदेसाई हे मराठी, कोंकणी आणि गुजरातीमधून इंग्रजीत अनुवाद करतात आणि अनेक अनुवादप्रकल्पांशी निगडित आहेत. १९९५ ते २००८ च्या दरम्यान ते मुंबईताल एका पदवीपूर्व कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत.

अक्दस एम्. जी. तातली यांनी मॅनेजमेंट स्टडीजमध्ये पदव्युत्तर शिक्षण रिझ्वी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज येथून पूर्ण केले आहे. सध्या ते आर्ट इंडिया मॅगझिनचे बिझनेस मॅनेजर म्हणून काम पाहतात. निरनिराळ्या पार्श्वभूमीच्या लोकांना भेटायला त्यांना आवडते.

झेहरा जुमाभॉय या आर्ट इंडिया मॅगझिनच्या असिस्टंट एडिटर आहेत. त्या पूर्वी ‘टाईम आउट मुंबई’ या पाक्षिकाच्या व्हिज्युअल आर्ट विभागाच्या संपादक होत्या. साहित्य आणि तत्वज्ञान या दोन्ही विषयांत त्यांनी वॉर्विक युनिव्हर्सिटी (UK) येथे पदव्युत्तर शिक्षण घेतले तसेच कोर्तो इंस्टिट्यूट ऑफ आर्ट येथे कलेच्या इतिहासाचे शिक्षण घेतले. झेहरा यांना समकालीन भारतीय कलेबद्दल लिखाण करायला आवडते.

     

सुपरसुडाका / चिली, अर्जेंटिना, मेक्सिको
पाब्लो कोर्व्हालान, फेलिक्स माद्राझो, मॅन्युएल डी रिव्हेरो, एलेना शेव्हत्शेंको
   
 

युआन पाब्लो कोर्व्हालान (जिनीव्हा, १९७३) यांनी कॅनडा, पराग्वे, चिली आणि स्वित्झर्लंडमध्ये वास्तव्य केले आहे. एकोल् द ‘ इंजिन्युअर्स डि जिनीव्हे (१९९६, स्वित्झर्लंड) येथून त्यांनी (वास्तुशास्त्रज्ञ) आर्किटेक्ट म्हणून पदवी घेतली, युनिव्हर्सिदाद द चिली (२०००, चिली) येथे स्नातकोत्तर अभ्यास आणि डिप्लोमा केला आणि बेर्लाग इन्स्टिटयूट (२००२, द नेदरलंडस्) येथून मास्टर्स पदवी मिळविली. ‘सुपरसुडाका’ चे संस्थापक सदस्य आहेत आणि अर्बन ऍक्शन ऍण्ड रिसर्च (नागरी कृती आणि संशोधन) यांमध्ये वैचारिक ‘गनीम’ (बंडखोर) आहेत.

फेलिक्स माद्राझो (साल्तिलो, १९७२) ला साल्ल युनिव्हर्सिटी (१९९६) मधून आर्किटेक्ट झाले, ऍरिझोना युनिव्हर्सिटी (१९९४) आणि सीसीसीबीयूपीसी, बार्सिलोना (२००१) च्या मेट्रोपोलिस पोस्टग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये अभ्यास केला. त्यांना मास्टर ऑफ आर्किटेक्चर ही पदवी बेर्लाग इन्स्टिटयूट, रॉटरडॅम (२००१-२००२) येथून मिळाली. ‘सुपरसुडाका’ ह्या प्रामुख्याने लॅटिन-अमेरिकेशी संबंधित संशोधन आणि प्रकल्प यांसाठी स्थापलेल्या सामुदायिक चळवळीचे संस्थापक आणि क्रियाशील सदस्य आहेत.

 

     

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस मीडिया लॅब / मुंबई
के.पी. जयशंकर, अंजली माँटेरो, शिल्पा फडके
    

द सेंटर फॉर मीडिया ऍण्ड कल्चरल स्टडीज (सी एम सी एस) हे टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेसचे एक स्वतंत्र केंद्र आहे जे माध्यमांचे शिक्षण, निर्मिती, संशोधन आणि प्रसार यांमध्ये गुंतलेले आहे. ह्या केंद्राचे एक एकमेवाव्दितीय वैशिष्टय म्हणजे त्याच्या कार्यातील तांत्रिक आणि सैध्दान्तिक बाजूंमधील अतिशय निकटचा संबंध. ह्या केंद्राचे कार्य दोन्ही विश्वांमध्ये संचार करते आणि त्यामुळे संशोधन, अध्यापन आणि निर्मिती यांच्यामध्ये एकात्मभाव निर्माण होण्यास मदत होते. ह्या सर्व प्रक्रियेत प्रतिकार आणि नवीन शोध यांवर आधारित स्थानिक दबलेल्या संस्कृतींमधील निकटच्या संबंधाची एक तीव्र जाणीव लक्षात घेतली जाते.